Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: शिक्षकांना मिळणार दिवाळी बोनस; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

शिक्षकांना मिळणार दिवाळी बोनस; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिक्षकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिक्षकांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. सदर बोनस मुंबई (Mumbai) महापालिका शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जाहीर केला आहे. (Mumbai Eknath Shinde News)

मुंबई महापालिका, बेस्‍ट कर्मचारी, शिक्षक (Teacher) व आरोग्‍य कर्मचारी यांना बोनस जाहीर केला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना महिन्‍याचा पगार २२ हजार ५०० रूपये हा दिवाळी बोनस म्‍हणून दिला जाणार आहे. यामुळे मुंबई महाालिकेच्‍या ९२ हजार कर्मचारी तसेच शिक्षक व आरोग्‍य कर्मचारींसह बेस्‍टचे २९ हजार कर्मचारींना हा बोनस मिळणार आहे.

१०४ शाळांच्‍या विषयांवर लवकरच बैठक

दसऱ्याच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देताना मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले, की सगळे शिक्षक खुश आहेत ना, बोनस मिळणार. यासोबत इतर विषय देखील सोडवणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तर शिक्षकांचा गुरुजन म्हणून सन्मान करण्याचा निर्णय देखील घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 104 शाळांचा विषय यावर स्‍वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेणार असल्‍याची त्‍यांनी जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT