Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास; ४ लॅपटॉप, ३ मोबाईलसह आरोपी ताब्‍यात

रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास; ४ लॅपटॉप, ३ मोबाईलसह आरोपी ताब्‍यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरी होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. शिवाय काही प्रवासी आपल्या वस्तू विसरूनही जातात. अशा वस्तू लंपास करणारे चोर लोहमार्ग पोलिसांच्या (Railway Police) रडारवर होते. अशाच एका चोराला मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या वांद्रे युनिट सहाच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान एकूण सात गुन्ह्याची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. (Maharashtra News)

बाबूराम रामनरेश चौहाण (वय ४७) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याला नेहरू तारांगण वरळी येथून (Crime News) ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार लॅपटॉप, तीन मोबाईल असा एकूण जवळपास एक लाख 96 हजार 490 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी अशा घटनांना आळा घालावा; यासाठी संबंधितांना आदेश दिले होते. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई यांच्या सुचनांनुसार सपोनि सचिन लोखंडे, पोलीस अंमलदार महेश सुर्वे, गणेश क्षिरसागर, वैभव शिंदे, रविंद्र दरेकर, सिकंदर तडवी, महेश काळे, प्रशांत साळुंखे, मयुर भैय्ये, सत्यजित कांबळे, मयुर साळुंखे, अमरसिंग वळवी, सागर हिंगे आणि संदेश कोंडाळकर यांनी ही कामगिरी पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT