Court Order 
महाराष्ट्र

गांजा तस्करी : पैठण, जळगावच्या संशयितांना १४ दिवसांची काेठडी

एनसीबी आता पुढे काय कारवाई करते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संताेष जाेशी

नांदेड : मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेड (nanded) मधील गांजा तस्करी प्रकरणातील संशयित आरोपींना आज (गुरुवार) बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती एस. बी. कुंडलीकर (सरकारी वकील, बिलोली) यांनी दिली. १५ नोव्हेंबरला मुंबई एनसीबीने (mumbai ncb) नायगाव तालुक्यातील मांजरम येथे एका ट्रकमधून ११ क्विंटल २७ किलो गांजा (cannabis) जप्त करत ट्रक चालक गोपू राजपूत (गोणबाची, पैठण) तर सुनिल महाजन (जळगाव) या दोन संशयित आरोपींना अटक केली होती. त्यावेळेस न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

आज कोठडीतील मुदत संपल्याने संशयित आरोपींना बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दाेघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान एनसीबीला या दोन्ही संशयित आरोपींकडून ठोस माहिती मिळालेली नाही. परंतु गांजा तस्करीची मोडसअप्रेंडी एनसीबीला कळाली आहे. एनसीबी आता पुढे काय कारवाई करते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव या ४ राशींवर कोपणार, काहींची होणार भरभराट; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

SCROLL FOR NEXT