CM Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde News: खड्ड्यांचा मुद्दा अधिवेशनात गाजताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर; ठाण्यातून पाहाणी दौऱ्याला सुरूवात

Mumbai Nasik Highway Potholes News: त्यामुळे अधिवेशनात खड्ड्यांचा मुद्दा जोरदार गाजला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Nasik Highway: नाशिक - मुंबई महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. अशात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनासाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना याच खड्ड्यांचा सामना करत वाट काढावी लागतेय. तसेच होत असलेल्या अपघातांमुळे अधिवेशनात खड्ड्यांचा मुद्दा जोरदार गाजला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळीच ठाणे शहरापासून खड्ड्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांचा सोबत केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, पोलीस अधिकारी आणि प्रशासन देखील सोबत आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावर (Mumbai Nasik Highway) खडवली फाट्या जवळ १८ जुलै रोजी खड्ड्यांमुळे अपघाताची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ६ जणांचा मृत्यू आणि ५ जण गंभीर जखमी होते. अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबांना शासनामार्फत ५ लाख रुपये मदत देण्यात आली.

याच मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरुवात केली आहे. तर जड वाहनांसाठी देखील पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाण्यापासून मुख्यमंत्र्यांनी या पाहाणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची ते स्वत: पाहाणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद

Bad Skin Habits: रोजच्या 'या' 4 सवयींमुळे त्वचा होतेय खराब, वेळीच द्या लक्ष, नाहीतर दिसाल म्हातारे

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

SCROLL FOR NEXT