Four Corporators and MNS Leader Join BJP Saam
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Four Corporators and MNS Leader Join BJP: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात इनकमिंग सुरू. मनसे नेते वैभव खेडेकर यांच्यासह ४ माजी नगरसेवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणातील नेत्यांकडून भाजपला साथ.

  • भाजप कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला.

  • वैभव खेडेकर यांचाही पक्षप्रवेश.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मुंबईतील भाजप कार्यलयात विविध पक्षातील चार नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यांच्यासह मनसे नेते वैभव खेडेकर यांचाही भाजप पक्षात प्रवेश झाला. तळकोकणातील बडा नेता आणि कराडमधील चार नगरसेवकांनी कमळ हाती घेतल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

कराडमध्ये भाजपच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची लगबग सुरू आहे. भाजपकडून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील कराड आणि तळकोकणातील बड्या नेत्यांनी आपआपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

कराडमध्ये भाजपची जोरदार इनकमिंग सुरू आहे. विविध पक्षातील चार नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यशवंत आघाडीतील महिला नेता स्मिता हुलवान आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विधानसभा निवडणूक लढवलेले इंद्रजित गुजर यांनीही भाजप पक्षात प्रवेश केला.

वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षात प्रवेश

तळकोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. तीन वेळा मुर्हूत हुकल्यानंतर त्यांचा अखेर आज पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काही महिन्यांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नंतर त्यांनी भाजप पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेश वारंवार लांबणीवर जात असल्यामुळे खेडेकरांवर टीकाही झाली. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून ऑफर मिळाली होती. मात्र, आज अखेर त्यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेता अन् तरुणी बेडवर नको त्या अवस्थेत, अश्लील व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; परप्रांतीयांची 2 किमीची रांग, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या पुलावरून कालव्यात कार कोसळली, अपघातात तिघे गंभीर जखमी

Monday Horoscope: कामाच्या नव्या संधी मिळतील, ५ राशींचे प्रेमसंबंध सुधारणार; वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

SCROLL FOR NEXT