Mumbai Local Train Updates  Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Local Train : मुंबईकरांचा भल्यापहाटे खोळंबा, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train Updates : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

Satish Daud

मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्यात देखील १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे भल्यापहाटे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईकरांच्या (Mumbai News) प्रवासाचा चांगलाच खोळंबा होत आहे. कधी पावसामुळे तर कधी तांत्रिक कारणामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असून अनेकांचे हाल होत आहे. प्रवाशांची सेवा करण्याचा गाजावाजा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला कधी जाग येईल? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

सध्या मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून रेल्वे रुळावर सातत्याने पाणी साचत आहे. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होत आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील (Mumbai Local Train Updates) वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे दादर, ठाणे, कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

आज रविवारी पुन्हा एकदा भल्यापहाटे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल आणि सीएसएमटी ते पनवेल या गाड्या उशिराने धावत आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेवरील वाहतूक देखील १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे भल्यापहाटे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT