Mumbai Local Railway Megablock Sunday  Saam Tv News
महाराष्ट्र

Sunday Local Block : घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा; रविवारी कोणत्या मार्गावर कसा असेल ब्लॉक? जाणून घ्या...

Mumbai Local Train Block : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २९.०६.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

मुख्य मार्ग

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर लाईन

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

हार्बर लाईन विभाग

पनवेल येथून १०.३३ ते दुपारी ४.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४५ ते दुपारी ४.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर लाईन विभाग

पनवेल येथून ११.०२ ते दुपारी ४.५३ पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते दुपारी ४.२० पर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT