abhimanyu gupta Saam Tv
महाराष्ट्र

टिकटॉक स्टारच निघाला अट्टल घरफोड्या; असं फुटलं बिंग

साम टिव्ही ब्युरो

कुर्ला : अलिशान जीवन जगण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका टिकटॉक स्टारला विनोबा भावे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिमन्यू गुप्ता असं या टिकटॉक स्टारचं नाव असून अलिशान आयुष्य जगण्यासाठी तो घरफोडी करत होता. अभिमन्यू हा समाज माध्यमावर खूपच प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी मिळवण्याबरोबरच त्याला अलिशान जीवन जगण्याचा शौक होता. गेल्या 18 मे रोजी कुर्ल्यातील ख्रिश्चन गाव येथील एका घराला कुलूप असल्याचे पाहून त्याने चोरी केली होती. (Mumbai Kurla Crime News)

यावेळी घरातून 279 ग्रॅम सोने आणि जवळपास दीड तोळे चांदीवर अभिमन्यू याने डल्ला मारला होता. या चोरीबाबत घर मालक मीरा सिमरेय्या यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. यावर वरिष्ठ पोलोस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी एक पथक तयार करून चौकशी सुरू केली. तसेच तांत्रिक बाबी तपासून अभिमन्यू गुप्ता याची माहिती मिळवली.

दरम्यान, खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी अभिमन्यू यास अटक केली. पोलिस चौकशीत त्याने यापूर्वी मुंबई,ठाणे,वसई विरार या ठिकाणीही घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टिकटॉक तसेच इतर समाज माध्यमात प्रसिद्ध आहे. त्याचे लाखो फॉलोअर्सवर असून फक्त आलिशान जीवन व्यथित करण्यासाठी हे काम करत असल्याचे आरोपीने सांगितले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी अभिमन्यू याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, 14 मोबाईल तसेच 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT