Kandivali Damu Nagar slum fire SaamTV
महाराष्ट्र

Kandivali Fire : मुंबईत आगीचं सत्र सुरुच; काल इमारतीला तर आज झोपडपट्टीला आग, रहिवाशांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

Mumbai Kandivali Damu Nagar Slum Fire : आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

Prashant Patil

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील अग्नी सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील गोदरेज या ११ मजली इमारतीला काल रात्री साडेदहच्या सुमारास आग लागली. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोवर आता उपनगरातील कांदिवली परिसरातील दामू नगर झोपडपट्टीला आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत.

दरम्यान, काल गोदरेज या इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगारांना याची जाणीवच नव्हती. मात्र, समोरच असलेल्या इमारतीमधील नागरिकांमुळे या कामगारांचे प्राण वाचले. नियमांची पायमल्ली करत बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप रहेजा विविएरा या इमारतीमधील रहिवाशांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT