mumbai high court grants bail to rajan salvi wife and son  saam tv
महाराष्ट्र

Rajan Salvi News : राजन साळवी कुटुंबीयांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

Mla Rajan Salvi Latest News : येत्या 21 तारखेला पुन्हा राजन साळवींच्या कुटुंबीयांची न्यायालयात सुनावणी हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमोल कलये

Ratnagiri News :

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार राजन साळवी (mla rajan salvi) यांच्या पत्नी व मुलास मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने साळवी कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा (anuja rajan salvi) आणि मुलगा शुभम (shubham rajan salvi) यांचा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.

न्यायालयात या अर्जाबाबत साेमवारी म्हणणे एेकून घेतले. साेमवारी दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने आज (मंगळवार) यावर सुनावणी ठेवली हाेती. मुंबई उच्च न्यायालयात आज राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना अंतरिम जामीन मंजूर मिळाला आहे. दरम्यान येत्या 21 तारखेला पुन्हा न्यायालयात सुनावणी हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT