Gudi Padwa MNS banner features Balasaheb Thackeray photo  Saam Tv News
महाराष्ट्र

शिवसेनेचा टायगर सगळ्यांनाच हवा, मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे; शिवसेनेसोबत जाण्याची मनसेची तयारी?

MNS Gudi Padwa : दस्तुरखुद्द बाळासाहेबांनीच आपला फोटो न वापरण्याची तंबी राज ठाकरेंच्या मनसेला दिली होती. आणि तेव्हा पासून राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर वापरणं बंद केलं.

Snehil Shivaji

स्नेहील झणके, साम टीव्ही

मुंबई : मनसेचा गुढीपाडवा मेळावा ३० तारखेला म्हणजेच येत्या रविवारी पार पडणार आहे. यासंदर्भातल्या टिझरसाठी राज ठाकरेंनी बॅनर्सवर थेट बाळासाहेबांचा फोटो वापरलाय. यावरुन उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केलीये पाहूया.

दस्तुरखुद्द बाळासाहेबांनीच आपला फोटो न वापरण्याची तंबी राज ठाकरेंच्या मनसेला दिली होती. आणि तेव्हा पासून राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर वापरणं बंद केलं. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून दुरावलेले २ भाऊ एकत्र येण्याची चर्चा असतांना आता राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. परंतू याच बॅनरवरुन आता उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच बाळासाहेबांच्या शिवाय पर्याय नाही असं म्हणत टोला हाणलाय.

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं म्हणत शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत मनसेच्या बॅनरवर सर्रास बाळासाहेबांचे फोटो लावले पण बाळासाहेबांनीच खडसावल्यानंतर मनसेनं बाळासाहेबांचे फोटो वापरणं बंद केलं परंतू आता जवळजवळ 18-19 वर्षांनी मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यानं आणि शिंदे ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या फोटोच्या वापरावरुन असलेला वाद म्हणजे अजूनही मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचंच निर्वावाद वर्चस्व असल्याची ग्वाही देतंय. त्यामुळे मुंबईत बाळासाहेब ठाकरे या ब्रॅण्ड शिवाय राजकारण करता येत नाही आणि त्यामुळेच सर्वांनाच शिवसेनेचा हा ढाण्या वाघ हवाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT