Mumbai Goa National Highway accident SaamTV
महाराष्ट्र

Raigad Accident : भरधाव आल्याने जोरात धडक, कंटेनर कारवर पलटी, एकाचा जागीच अंत; रायगडमध्ये भीषण अपघात

Raigad Accident News : ठाण्यावरुन वडखळकडे जाणाऱ्या एका कारला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनर थेट कारवर उलटला.

Prashant Patil

रायगड : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पेण-पनवेल मार्गावर या भीषण अपघाताची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.

कसा झाला अपघात?

ठाण्यावरुन वडखळकडे जाणाऱ्या एका कारला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनर थेट कारवर उलटला. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये एकाचा जागीच मृ्त्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. पनवेल पोलिस स्टेशन हद्दीत कर्नाळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. हा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

कारचा झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांपैकी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील महिला गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना वाहनाच्या बाहेर काढलं आणि त्यांनी तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. हायड्राच्या साहाय्याने कारवर उलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT