Mumbai Goa Highway Traffic News SAAM TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; 6-7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Goa Highway Traffic News : मुंबई-गोवा महामार्गावर आज, शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Nandkumar Joshi

सचिन कदम

Mumbai Goa Highway Traffic News :

मुंबई-गोवा महामार्गावर आज, शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेल पळस्पे फाट्याजवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहने अक्षरशः अडकून पडली आहेत. सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु असून चोपदरीकरणातील एक मार्ग पुर्णपणे बंद आहे. यामुळे मुंबईकडे येणारी आणि मुंबईतून कोकणात जाणारी वाहतुक एकाच मार्गावरून होत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. (Latest Marathi News)

मागील आठवड्यात लाँग वीकेंड असल्यामुळं मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या आठवड्यातही पुन्हा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल पळस्पेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गोवाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे एक मार्गिका बंद आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT