Mumbai-Goa Express Way Accident Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Express Way Accident: भीषण अपघातात पती-पत्नीची ताटातूट; पतीचा जीव वाचला पण पत्नीचा मृत्यू

Accident: या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Mumbai-Goa Express Way : समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण थांबता थांबत नाहीये. सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. अशात आता मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकला चारचाकीने मागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. (Accident)

स्पृहा खवळे वय (वर्ष 24 रा. देवगड) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर तीचा पती सुमित खवळे (वय वर्ष 28) हा जखमी झाला आहे. खवळे दांपत्य देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन येत असताना मुंबई गोवा महामार्गावर पेण नजीक हमरापुर येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

गेल्या तीन दिवसांपासून महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे पहायाला मिळाले. मोठा वीकएन्ड मिळाल्याने अनेक नागरिक आपल्या गावी निघाले होते. त्यामुळे शनिवारी आणि सोमवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अशात खवळे दांपत्य देखील सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते. देवगड येथून आपल्या मुंबईमधील नातेवाईकांसाठी त्यांनी आंबे आणले होते.

गावाहून घरी घेऊन नेत असलेला हा मेवा शेवटचा ठरेल याची कोणालाच काही कल्पना नव्हती. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Express Way) त्यांची कार पोहचली तेव्हा त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे समोर असलेल्या गॅस सिलींडरच्या गाडीवर त्यांची चार चाकी धडकली. या भीषण अपघातात खवळे यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT