School Bus Caught Fire Saam TV
महाराष्ट्र

School Bus Caught Fire: धक्कादायक! शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाताना मोठी दुर्घटना; धावत्या बसने घेतला पेट, पुढे काय घडलं?

Fire News: काळी मुलांना शाळेत घेऊन जात असताना बस मधून अचानक धूर निघू लागला.

Ruchika Jadhav

Mumbai Fire News: मुंबईतून आगीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाताना बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे विद्यार्थी पूर्ण:ता भयभीत झालेत. (Latest Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विरारमधिल (Virar) विवा कॉलेज रोडवर ही घटना घडली आहे. यात शाळेच्या बसला आग लागली असून बस पूर्णता जळून खाक झालीये. सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात असताना बसमधून अचानक धूर निघू लागला. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना तात्काळ बसमधून उतरवले.

रस्त्यावर उपस्थित नागरिकांच्या मदतीने सर्व मुलांना खाली उतरवण्यात आले. तसेच वाहन चालकाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखव होऊन आगीवर (Fire) नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोदामाला भीषण आग, कोट्यावधींचे नुकसान

दोन दिवसांपूर्वीच भिवंडीत आगीची मोठी घटना घडली होती. या घटनेत एका गोदामाला भीषण आग लागली होती. आगीमुळे एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रो ओव्हन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना काल (२४ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मात्र ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT