Mumbai Crime News Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Crime News: मोठ्या बहिणीच्या घरी आला अन् मंगळसूत्र घेऊन फरार झाला; भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Crime News: आरोपी आपल्या बहिणीच्या घरी ३ ते ४ दिवस राहण्यासाठी आला होता. दोन दिवस त्याने आपल्या बहिणीचा रोजदा दिनक्रम काय आहे यावर लक्ष ठेवले.

Ruchika Jadhav

Mumbai Crime News:

भाऊ आणि बहिण यांचं नातं फार अनोखं असतं. आपल्या भावाला किंवा बहिणीला दोघेही कोणत्याही त्रासात पाहू शकत नाहीत. मात्र मुंबईच्या अंधेरीमध्ये एका भावानेच आपल्या बहिणीचं मंगळसूत्र चोरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंधेरी पीएमजीपी कॉलनी, पूनम नगर येथे सोमवारी ही घटना घडली आहे. अमर असं आरोपी भावाचं नाव आहे. आरोपी आपल्या बहिणीच्या घरी ३ ते ४ दिवस राहण्यासाठी आला होता. दोन दिवस त्याने आपल्या बहिणीचा रोजचा दिनक्रम काय आहे यावर लक्ष ठेवले.

बहिण तिच्या मुलांना शाळेत सोडायला केव्हा जाते ती परत घरी केव्हा येते यावर त्याने लक्ष ठेवलं. सोमवारी बहिण शाळेत मुलांना सोडवण्यासाठी गेली होती. बहिण घरी नसल्याची संधी साधून भावाने बहिणीच्या घरात बेडवर असलेलं मंगळसूत्र चोरलं आणि तो फरार झाला. थोड्यावेळाने बहिण घरी आली तेव्हा आपल्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचं तिच्या लक्षात आलं.

तिने मंगळसूत्र शोधण्यास सुरूवात केली. मंगळसूत्र आपण बेडवर ठेवून तसेच शाळेत गेलो होतो हे तिच्या पटकन लक्षात आलं. त्यामुळे तिने बेडवर शोधाशोध केली मात्र मंगळसूत्र मिळालं नाही. तसेच आपला भाऊ देखील घरात नसल्याचं तिला समजलं. झालेल्या घटनेबाबत तिने तातडीने पतीला फोनवर याची माहिती दिली.

पुढे पतीसोबत एमआयडीसी ठाण्यात जाऊन महिलेने झालेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली. चोरीला गेलेलं मंगळसूत्र ५५ ग्रामचं होतं. याची एकूण किंमत २.२ लाख रुपये इतकी होती. पोलिसांनी पुढे भावाचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासात आरोपी गोव्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी गोव्यात त्याचा तपास करून त्याला अटक केली. आरोपी भावावर कलम ३८० अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reetha- Shikakai Hairpack: केस गळण्याची समस्या झटक्यात होईल दूर, एकदा लावून पाहा रिठा- शिकेकाईचा हेअर पॅक, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

Maharashtra News Live Update: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू; पगारापासून ते PF वर होणार परिणाम; वाचा सविस्तर

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

SCROLL FOR NEXT