Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sanpada Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी; मित्राच्या सहाय्याने चाकू हल्ला; धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: शुल्लक कारणावरून थेट डोक्यात खुपसला सुरा, पुढे काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Crime News: मुबंईतून भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाच्या मानेवर आणि डोक्यावर भावानेच चाकू हल्ला केलाय. या हल्ल्यात तरुण जखमी असून त्याने स्वत: जखमी अवस्थेत रुग्णालय गाठले आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latets Crime News)

घर म्हटलं की तिकडे काहीनाकाही आणि कोणत्यानाकोणत्या कारणावरून भांडणे होतात. तरुण मुलांना फार पटकन राग येतो. त्यामुळे त्यांच्या हातून नकळत मोठे गुन्हे घडतात. अशात सानपाडाच्या सेक्टर ५ मध्ये राहत असलेल्या तेजस पाटीलवर हल्ला झाला आहे. हल्ला केल्यावर आरोपी भावाने तेथून पळ काढला.

भावाभावांमधील वाद जिवावर बेतला

रागावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे असते. नियंत्रण नसल्यास मोठ्या चूका घडताता. सानपाड्यात देखील तेजस आणि त्याचा भाऊ या दोघांचे काही शुल्लक कारणावरून वाद झाले. या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. भावाला तेजसचा फार राग आला. त्याने तेजसवर थेट चाकू उगारला. तसेच त्याच्यावर मोठा घाव घातला.

चाकूने थेट डोक्यावर वार करण्यात आला. डोक्याला चाकू लागल्याने जास्त रक्तप्रवाह होऊ लागला. त्यामुळे तेजस स्वत: रुग्णालयात (Hospital) गेला. त्याने चाकू डोक्यात रुतलेल्या अवस्थेत दुचाकी चालवली. दुचाकीवरून त्याने मोठं अंतर कापत दवाखाना गाठला. उपचार घेतल्यावर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी भावाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT