अकोले भात लावणी 
महाराष्ट्र

वाकी जलाशय काठोकाठ, मुळा-कृष्णवंती नदीला पूर

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : नगर जिल्हा आणि मराठवाड्यासाठी नगर जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदार ही धरणे महत्त्वपूर्ण आहेत. मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरू आहे. भातखाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतकरी गाळ तुडवणी, आवणीची कामे करताना दिसत आहेत.

बारी, वारूंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पहाटे तीन वाजता वाकी जलाशयाचा ११२.६६ दशलक्ष घनफूट साठा झाल्याने ते शंभर टक्के भरले. कृष्णवंती नदीला पूर आला आहे. बलठण धरण २०२ दशलक्ष घनफूट झाले आहे. यापूर्वी अंबित, पिंपळगाव खांड, देवहंडी, कोथळा, जलाशय भरले आहेत.Mula and Krishnavati rivers flood

कोदणी वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. रंधा धबधबा सुरू झाला आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात अवाक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदावणे येथील बुवांजी गांगड, सखाराम गांगड यांचे घरावरील कौले उडाले. गुहीरे, रंधा परिसरात वादळ व बीएसएनएलचे वायरमुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने परिसरातील दहा गावे काही काळ अंधारात होती.

वीज कर्मचारी दत्ता भोईर यांनी नियोजन करून वीज पूर्ववत केली. काल झालेल्या पाऊसमुळे भंडारदरा जलाशयात ४५९ दशलक्ष घनफूट आवक झाली आहे.

जलाशयात ६६२७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६०.२% साठा झाला आहे. वीजनिर्मितीसाठी ८४० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. निळवंडे जलाशयात १४३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली तर जलाशयात १९१३ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा २२.९७% उपलब्ध आहे.

आढळा धरणामध्ये ४८७ दशलक्ष घनफूट ४५.१९% साठा आहे. मुळा जलाशयात वेगाने अवाक होत आहे. कोतूळ येथील पुलावरून १६७५० क्युसेक्सन मुळाचा विसर्ग सुरू होता. प्रवरा, मुळा, आढळा नद्या वाहू लागल्या आहेत. मुळा नदीला मध्यरात्री पुर आला आहे.Mula and Krishnavati rivers flood


Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT