Ladki Bahin Yojana news Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकींच्या खात्यात खटाखट ₹१५०० रुपये जमा होण्यास सुरूवात, लगेच SMS करा चेक

Ladki Bahin Scheme Funds Start Reaching Accounts: लाडकी बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास आजपासून सुरूवात झाली. आताच एसएमएस चेक करून खात्यात १५०० रुपये आले की नाही ते पाहा.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता सुरू

  • लाडकीच्या खात्यात १५०० रुपये जमा

  • पुढील २-३ दिवसांत पूर्ण वितरण होणार

  • मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाने आधीच फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वितरित करण्यासाठी २२७ कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानंतर आता लाडकींच्या खात्यावर १५०० रुपये जमा होण्यास आजपासून सुरूवात झाली.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की , 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.'

आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की, 'महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महत्वाकाक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. दरमहिन्याला महिलांच्या खात्यात निधी जमाम केला जातो. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे २३ फेब्रुवारीला देण्यात आला होता. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष फेब्रुवारीचा हफ्ता कधी येणार याकडे लागले होते. अखेर आजपासून या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT