Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांचा लाभ बंद होणार, 26 लाख लाडकींची चौकशी सुरू, कुटुंबातील 3 लाभार्थ्यांची यादी तयार

Mukhyamantri - Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेची चौकशी सुरू झाली आहे. अनेक अपात्र महिलांनी व काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्याने चौकशी सुरू झाली आहे. तब्बल 26 लाख महिलांची पात्रतेसाठी चौकशी होणार आहे.

Girish Nikam

  • लाडकी बहिण योजनेतील 26 लाख महिलांची पात्रतेसाठी चौकशी सुरू.

  • एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ घेता येत नसतानाही गैरवापर.

  • 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांकडून लाभ रक्कम वसूल होणार.

  • पात्र लाभार्थ्यांना हप्ता सुरूच; अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हफ्ता देण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरु झाली आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...

लाडकी बहिण योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच सरकारने आता सगळं लक्ष अपात्र लाभार्थ्यांकडे वळवलं आहे. त्यासाठी प्रशासनाने अर्जांची पडताळणी सुरु केली आहे. निकषात न बसलेल्यांची चौकशी सुरु करण्यात आली असून अंगणवाडी सेविकांची त्यासाठी मदत घेतली जात आहे.

लाडकी व्यतिरीक्त दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. तसंच एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केलीय. या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करायला सुरुवात करण्यात आली आहे.

एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई सुरू झालेली असली दुसरीकडे ही योजना सुरुच राहणार असल्याची ग्वाही अदिती तटकरेंनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हफ्ता मिळायला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी सरकारने लाडक्यांना ओवाळणी दिली आहे. या योजनेचा लाभ सध्या दोन कोटी 29 लाख महिलांना मिळत आहे. मात्र ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाखो लाडक्या बहिणी यातून वगळल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे या योजनेत घुसखोरी करुन सरकारी पैशांवर डल्ला मारणाऱ्या 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांना नोटीस देऊन त्यांच्याकडून पैसे वसुल केले जाणार आहेत. त्यामुळे एक वर्षानंतर तरी गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT