Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : जालन्यातील ७ हजार लाडक्या बहिणींना ७५०० मिळालेच नाहीत, पुन्हा अर्ज करता येणार?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : जालना जिल्ह्यात 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.

Namdeo Kumbhar

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची महत्त्वकांशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. मात्र जवळपास सात लाडक्या बहिणी लाभापासून अद्यापही वंचित आहेत. जालना ,बदनापूर, भोकरदन, परतुर, घनसावंगी या तालुक्यातील 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जवळपास सात हजार लाडक्या बहिणी अद्यापही लाभापासून वंचित असल्याच पाहायला मिळतेय.

आधार लिंक नसल्याने लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित -

जालना जिल्ह्यात जवळपास सात हजार लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. दरम्यान बँकेमध्ये लाभार्थी महिलांचे आधार लिंक झालेले नसल्याने हे पैसे त्यांना मिळाले नाहीत. दरम्यान बँक खात्याला आधार लिंक झाल्यानंतर राहिलेल्या महिलांना पैसे मिळतील अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिली आहे.

जालना तालुका आघाडीवर -

जालना जिल्ह्यात एकूण 5 लाख 42 हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. जालना जिल्ह्यात जालना तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 33 हजार 31 एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर सर्वाधिक कमी जाफराबाद तालुक्यात 44 हजार 920 एवढ्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

तालुकानिहाय लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या

1) अंबड : 73 हजार 465

2) जालना : 1 लाख 33 हजार 31

3) बदनापूर : 45 हजार 167

4)भोकरदन : 86 हजार 051

5) जाफ्राबाद : 44 हजार 920

6) मंठा : 45 हजार 821

7) परतूर : 50 हजार 529

8) घनसावंगी : 63 हजार 381

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT