Ladki Bahin Yojana December Installment SAAM TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहि‍णींचे १५०० रूपये आले, बँकेत न जाता पैसे कसे चेक कराल?

Ladki Bahin Yojana December Installment: महायुती सरकारच्या घवघवीत यशामध्ये लाडक्या बहि‍णींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आता सहावा हप्ताही जमा होण्यास सुरूवात झालीय.

Bhagyashree Kamble

लाडकी बहीण योजना. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रचंड गाजली. मुख्य म्हणजे महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली. या योजनेमुळं लाडक्या बहि‍णींचं पाठबळ मिळालं असल्याचं महायुती सरकारच्या नेते मंडळींनी म्हटलंय. विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं. पण त्यानंतर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागली. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. कारण लाडक्या बहि‍णींचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहि‍णींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महायुती सरकारच्या घवघवीत यशामध्ये लाडक्या बहि‍णींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. विधानसभेची निवडणूक होण्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ओवाळणी म्हणून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र डिसेंबर महिन्यातील सहावा हप्तेच्या प्रतिक्षेत महिलावर्ग होत्या. पण अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.

लाभार्थी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महिलांच्या खात्यात १५०० रूपये बँकेत जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सरकारनं आपला शब्द पाळला. सरकारनं वर्षेअखेर लाडकी बहि‍णींना गोड भेट दिली आहे. ज्यामुळे महिलावर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीनं लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात २१०० जमा करण्यात यावे अशी अपेक्षा महिला वर्गाने व्यक्त केली आहे. पण सध्या लाडक्या बहि‍णींना अनुदान मिळल्यानं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाला सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारंबळ

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT