MSRTC earn from Pandharpur Wari  Saam TV Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल 'इतक्या' कोटींचं उत्पन्न, सरनाईकांची माहिती

MSRTC revenue from Pandharpur Wari : आषाढी वारी २०२६ दरम्यान एसटी महामंडळाने ५,५०० विशेष बस आणि २१,५२७ फेऱ्यांच्या माध्यमातून ९.२४ लाखांहून अधिक भाविकांना सेवा दिली. या विशेष वाहतुकीतून एसटीला तब्बल ₹४१.१८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Bharat Mohalkar

How much revenue did MSRTC earn from Pandharpur Wari 2026 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. विठ्ठलाच्या सेवेमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. यंदा ५५०० बसमधून ९ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक एसटी विभागातून वारीसाठी स्पेशल एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. त्यामधून कोट्यवधींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

याबाबत सरनाईक म्हणाले, “गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचे भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभते. एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, ही केवळ प्रवासी वाहतूक नाही; ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठलसेवाच आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT