Pusad-Akola ST bus engulfed in flames at Khandala Ghat  Saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

MSRTC Bus Fire: यवतमाळच्या खंडाळा घाटात धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. बसमधून ४३ प्रवासी प्रवास करत होते. परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचलाय.

Bharat Jadhav

  • खंडाळा घाटात पुसद-अकोला एसटी बसला आग लागलीय.

  • बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते.

  • चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. पुसदहुन अकोल्याकडे एसटी बसला भीषण आग लागल्या घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार ही बस पुसद-अकोला एसटी बस होती, आणि त्या बसमधून ४३ प्रवासी प्रवास करत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतला. ही दुर्घटना खंडाळा घाटात घडली. बस धावत असतानाच बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एसटी बसचा समोरील केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

Wednesday Horoscope: कामात संधी, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा बुधवारचं राशीभविष्य

मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

SCROLL FOR NEXT