tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival, Solapur, MSRTC Bus saam tv
महाराष्ट्र

Navratri 2022 : तुळजापूरला जाण्यासाठी 'येथून' साेडली जात आहे मिनिटाला बस (पाहा व्हिडिओ)

त्यामुळे भाविकांचा विनाअडथळा आणि विनाविलंब प्रवास सुखकर होत आहे.

विश्वभूषण लिमये

Tuljabhavani : नवरात्रोत्सव (navratra) निमित्त लाखो भाविक तुळजापूरला (tuljapur) आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जात आहेत. तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने साेलापूर येथून रोज एकशे साठ बस गाड्यांचे नियोजन तुळजापूरसाठी केले आहे. यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. (Maharashtra News)

नवरात्रोत्सव निमित्त सोलापूर ते तुळजापूर तसेच तुळजापूर ते सोलापूर या मार्गावर रोज एकशे साठ बस गाड्या धावताहेत. सोलापूर बसस्थानकावर तसेच तुळजापूर बस स्थानकावर प्रत्येक मिनिटाला भाविकांसाठी बस सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा विनाअडथळा आणि विनाविलंब प्रवास सुखकर होत आहे. (Tajya Batmya)

दसरा उत्सवापर्यंत या बसेस सोलापूर ते तुळजापूर आणि तुळजापूर ते सोलापूर मार्गावर धावतील. त्यासोबत इतर ठिकाणासाठीही या बसच्या फे-या सुरु आहेत. त्यानंतर बस पूर्वस्थळी म्हणजे सोलापूर आगारात परततील अशी माहिती दत्तात्रय कुलकर्णी (सिनियर डेपो मॅनेजर,सोलापूर) यांनी दिली. कुलकर्णी म्हणाले सध्या एसटीचे उत्पन्न पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहे. नवरात्रोत्सव पूर्वी एसटीचे रोजचे उत्पन्न ७० ते ८० लाख रूपये इतके होते.

दरम्यान दर मिनिटाला बसचे नियोजन केल्याने बस स्थानकावर भाविकांची उत्तम साेय झाली आहे. चेंगराचेंगर किंवा बससाठी भाविकांची गोंधळ थांबला आहे. बस गाड्यांच्या क्रमांकासह वारंवार सूचना दिल्या जात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT