महावितरणतर्फे महाडमध्ये युद्धपातळीवर काम सुरू  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

महावितरणतर्फे महाडमध्ये युद्धपातळीवर काम सुरू

महावितरण कर्मचाऱ्यांनी नदी प्रवाहात उतरून मगरीशी झुंज देत केले उल्लेखनीय काम; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले कर्मचाऱ्यांचे कौतुक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्यभरात विविध ठिकाणी महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाडमध्ये देखील पुरामुळे शहरातील महावितरणचे अतोनात नुकसान झाले असून वीज पुरवठा पूर्ण खंडित झाला आहे.

हे देखील पहा -

असे असतानाही महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सावित्री नदीमध्ये मगरी असताना देखील महावितरण कर्मचारी धोका पत्करून सर्वसामान्यांसाठी कर्तव्य बजावत आहेत. महाड मधील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्यातील वीजपुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

अतिवृष्टीने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. महाड मधील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यातील महावितरणची टीम दाखल झाली आहे. तर ज्याठिकाणी वीज सुरू झाली नाही त्याठिकाणी सोलर दिवे बसवण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT