msc bank seized shri vitthal sahakari sakhar karkhana godown
msc bank seized shri vitthal sahakari sakhar karkhana godown saam tv
महाराष्ट्र

Abhijeet Patil: विठ्ठल कारखान्यावर राज्य सहकारी बँकेची जप्ती; राजकीय द्वेषातून कारवाई : अभिजीत पाटील, Video

भारत नागणे

Pandharpur :

जुन्या संचालक मंडळांन घेतलेल्या कर्ज वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Co-operative Bank) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई केली. यामध्ये बँकेने साखरेचे गोडवूनसह इतर मालमत्ता ताब्यात घेण्यात आली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतून कारवाई झाल्याचा आराेप अभिजित पाटील यांनी केला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

करमाळा येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा हाेती. या सभेस अभिजीत पाटील हे देखील सहभागी हाेते. महाविकास आघाडीच्या प्रचारात ते सक्रिय आहेत. शरद पवार यांची सभा सुरू असतानाच अभिजीत पाटील हे सभास्थळावरुन अचानक निघून गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ते श्री विठ्ठल कारखान्यावर गेले.

अभिजीत पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना जुन्या संचालक मंडळाने घेतलेल्या 430 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी पुणे येथील डीआरटी कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. या सुनावणी मधील स्थगिती उठवल्यानंतर तातडीने आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर येऊन साखरेचे गोडाऊन सील केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता यामुळे ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना पैसे देणे अडचणीचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत जाणून बुजून राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोप श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT