MPSC Student Protest In Pune SAAM TV
महाराष्ट्र

MPSC Aspirants Protest: एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक! 'या' प्रमुख मागणीसाठी पुकारले राज्यव्यापी आंदोलन

पुणे, कोल्हापूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये आज एमएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.

Gangappa Pujari

MPSC Students Protest: राज्यातील विविध शहरांमध्ये आज एमएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. (MPSC Protest)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील काही शहरात आज एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू असून MPSC च्या राज्यसेवा परिक्षेच्या नव्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. MPSC राज्य सेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे. जो पर्यत सरकार आणि आयोग मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याच या विद्यार्थ्यांनी सांगितले आङे

यापूर्वी देखील या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही, तोवर आम्ही अलका टॉकीज चौकातून जाणार नाही.असा इशारा एमपीएससी विद्यार्थीनी दिला आहे.

त्याचबरोबर याच मागणीवर कोल्हापूरच्या सायबर चौकात मोठ्या संख्येने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, पुण्यासह नागपुरातही (Nagpur) आंदोलन सुरु केले आहे. NSUI च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT