मुंबई : राज्यातील अत्यंत महत्वाच्या शासकीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्वपरीक्षा २०२२ ची तारीख झाहीर झाली असून याबाबतची घोषण नुकतीच करण्यात आलीय. ही परीक्षा (MPSC Prelims Exam) २१ ऑगस्टला होणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाने जाहिरात (क्रमांक 045/2022) द्वारे बुधवारी प्रसिद्ध केली. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण (MPSC Recruitment 2022) 161 पदांची भरती होणार असल्याचं आयोगाने एमपीएससीच्या ट्विटरवरून जाहीर केलं आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूवर्ण संधी मिळाली असून परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केलं आहे.
१६१ पदांवरील भरतीकरिता राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच जाहिरातील गट 'अ' ५९, तर गट 'ब' साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार आहे. दरम्यान, पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळणार आहे. तसंच एमपीएससी मुख्य परीक्षा २१, २२, २३ जानेवारी २०२३ किंवा त्यानंतर घेतली जाण्याची शक्यता आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज गुरुवारपासून सुरु झाली असून १ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. आयोगाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आल्याने काही काळ विद्यार्थ्यांना जाहिरात दिसन नव्हती.त्यामुळे विद्यार्थी पुरते गोंधळात पडले होते. त्यानंतर आयोगाने तांत्रिक समस्या दूर करुन जाहीरात संकेत स्थळावर दिसत असल्याची माहिती दिली.नुकतीच २०२० च्या राज्य सेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.