MPSC Exams Saam tv
महाराष्ट्र

MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्या, वयोमर्यादा वाढवल्याने वेळापत्रकामध्ये मोठा बदल

MPSC Postpones Exams: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी एका वर्षाची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता वयाधिक उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

Saam Tv

MPSC Exams: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासनाने विशेष बाब म्हणून वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची वाढ केल्याने एमपीएससीचा निर्णय घेतला आहे. तेव्हा वयाधिक उमेदवारांना ६ जानेवारी २०२५ पर्यंत परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ठराविक जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.

राज्य सरकारने वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे एमपीएससीद्वारे 'गट ब आणि गट क'च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ५ जानेवारी २०२५ रोजी 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' होणार होती. आता ही परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. तर 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' २ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार होती. ती आता ४ मे २०२५ ला होणार आहे.

एमपीएससीच्या परीक्षांसाठी वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. ६ जानेवारी २०२५ पर्यंत इच्छुक वयाधिक उमेदवार अर्ज करु शकतात. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये यासंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC Letter

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केल्यानुसार, 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' आणि 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' या परीक्षांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना ठराविक सहा जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांचा समावेश आहे. उमेदवार या जिहा केंद्रांवरील उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT