mp vinayak raut criticizes nitesh rane in sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Raut vs Rane: भाजपने बाडग्या लोकांना पुढे केल्यानेच ते कोकलतात : खासदार विनायक राऊतांचा राणेंना टाेला

स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नितेश राणेंच्या वडिलांनी अजमेरच्या दर्ग्यात जावून मन्नत मागितलेली चालते का?

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

मतांसाठी तुम्ही लाचारी पत्करली तर चालते मात्र आमच्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) एखादे पाऊल उचलले तर नितेश राणेंच्या (nitesh rane) पोटात पोटशुळ उठतो. बाडगाचं कोडगा असतो. भारतीय जनता पक्षाने (bjp) बाडग्या लोकांनाच पुढे केले आहे म्हणूनच ते कोकलतात अशा शब्दात खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी आमदार नितेश राणेंनी सेना नेते उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंवर (aditya thackeray) केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. (Maharashtra News)

भाजप सोबत ज्या शिवसेनेची युती होती तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी आज (बुधवार) सिंधुदुर्ग येथे केली. त्यास खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

खासदार विनायक राऊत म्हणाले स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नितेश राणेंच्या वडिलांनी अजमेरच्या दर्ग्यात जावून मन्नत मागितली. नितेश राणे कणकवलीच्या (kankavli) नांदगाव येथील दर्ग्यात जावून अनेकवेळा माथा टेकतात. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेल होतं? असा सवाल खासदार राऊत यांनी राणेंना केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राऊत म्हणाले मतांसाठी तुम्ही लाचारी पत्करली तर चालते मात्र आमच्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एखाद पाऊल उचललं तर नितेश राणेंच्या पोटात पोटशुळ उठतो. बाडगाचं कोडगा असतो. भारतीय जनता पक्षाने बाडग्या लोकांनाच पुढे केल आहे म्हणूनच ते कोकलतात. अशा शब्दात विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT