Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचंय; CM शिंदेंचे खासदार पुत्र नेमकं काय म्हणाले?

shrikant Shinde on mva cm face : खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून विरोधकांवर तोफ धाडली आहे. महाविकास आघाडीत प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचं आहे, असं म्हणत खासदार शिंदे यांनी टीका केली आहे.

विजय पाटील

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करण्यास सांगितलं आहे. यावरून महाविकास आघाडीत बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिदाचा चेहरा कोण असणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर सत्ताधाऱ्यांचंही लक्ष्य आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीत प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचंय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे हे सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी इस्लामपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'महाविकास आघाडीत आज प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचं आहे. भर सभेत आपले नाव जाहीर करा,असे सांगितले जात आहे,अशी टीका शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जनसंवाद दौऱ्याविषयी बोलत होते.

'लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी'

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना श्रीकांत शिंदे म्हणाले,'महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेची धडकी भरली आहे. लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे'.

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर भाष्य करताना खासदार शिंदे म्हणाले, 'आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या तरुणांना महायुतीत शिवसेनेकडून संधी दिली जाईल'.

'विरोधकांच्याकडे आता काही उरलं नाही, केवळ खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा नियोजन सुरू असून ते त्यांच्याकडून केलं जातंय,असा आरोप देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT