Omraje Nimbalkar 
महाराष्ट्र

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

Omraje Nimbalkar first reaction after verdict : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल २० वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Namdeo Kumbhar

तब्बल २ वर्षानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मुंबई न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. खटल्याचा निकाल कोर्टाने दिल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.

न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. "हा निकाल अत्यंत दुर्दैवी असून आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहोत," असे ओमराजे म्हणाले. गेल्या २० वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांसोबत आम्हीही मोठा लढा दिला, अशी आठवण त्यांनी करून दिली. कोर्टाचा निकाल असल्याने तो स्वीकारावाच लागेल, असे सांगत त्यांनी आता यावर अधिक भाष्य न करता उच्च न्यायालयात बाजू पटवून देण्याला आमचे प्राधान्य असेल आणि तिथून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

ठाकरेंसोबत राहणार का?

मी कार्यकर्त्यांसोबत जाऊन धाराशिवमध्ये जाऊन निर्णय घेणार आहे. माझ्यासाठी कार्यकर्त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. निकालाचा आणि राजकीय निर्णयाचा काहीही संबंध नाही, असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

शिंदे सेनेत प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाशी निर्णयाचा संबंध नाही.
खासदार ओमराजे निंबाळकर

CBI वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात CBI वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी CBI ला निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT