Omraje Nimbalkar विनोद जिरे
महाराष्ट्र

ईडी आणि आयटीच्या कारवाईवरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक

भाजपच्या एकतरी नेत्यावर कारवाई झाली का? - ओमराजे निंबाळकर

विनोद जिरे

बीड: आज देशात सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग सुरू आहे. राजकीय (Political) द्वेष काढण्यासाठी, ईडी (ED) आणि आयटी सारख्या कारवाया केल्या जात आहेत. आजपर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई झाली नाही, मग इतरांवरचं कारवाया कशा काय होतात? असा सवाल करत शिवसेना खासदार (Shiv Sena) ओमराजे निंबाळकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते बीडमध्ये (Beed ) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे देखील पहा-

आता सामान्य माणसाला देखील कळतंय की या देशात काय सुरू आहे. जे काही प्रकार चालू आहेत, तो सरकारी यंत्रणांचा दुरपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं की या अगोदर कुठल्याच सरकारमध्ये असा दुरुपयोग पाहायला मिळालं नाही. राजकीय मतभेद असतील, राजकारणामध्ये (politics) कुठलातरी एक पक्ष जिंकत असतो, हरत असतो, एका पक्षाचे सरकार येत असतं, काही काळ त्याला लोकप्रियता मिळते. मात्र, एक लक्षात घ्या, "जशी भरती असते तशी ओहटी देखील असते" या ठिकाणी कोणीही ताम्रपट घालून जन्माला येत नाही. असे म्हणत सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले आहे.

त्यामुळे जे काय चाललंय ते योग्य पद्धतीने चालले आहे, असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीकडून केवळ विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करून, कारवाया केले जात आहेत. आणि आता हे सर्वसामान्य नागरिकांना कळून चुकलं आहे, खरंच जर एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर खासदार- आमदारांवर रेड पडली असती, तर सर्वसामान्य माणसाने त्याकडे दुर्लक्ष केले असते. मात्र, आता हे सर्व नागरिकांना कळून चुकले आहे, "अतिशय द्वेषपूर्ण भावनेतून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झालेला दिसतोय. असं म्हणत खासदार (MP) ओमराजे निंबाळकर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. यावेळी माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर देखील उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT