Chandrapur News Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur News: उद्घाटनावेळी मंत्री-खासदारांमध्ये वाद; मुनगंटीवार यांना धानोरकरांनी कार्यक्रमातच सुनावले, कारण?

द्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात नव्या सुविधांची उभारणी व लोकार्पण कार्यक्रमात काँग्रेस- भाजप दरम्यान वेगळाच वाद उसळला.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात नव्या सुविधांची उभारणी व लोकार्पण कार्यक्रमात काँग्रेस- भाजप दरम्यान वेगळाच वाद उसळला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दोन तास उलटूनही न आल्याने ताटकळत असलेले खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच सुविधांचे लोकार्पण केले. वेळेवर न येणे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा क्रीडा संकुलात नव्या सुविधांची उभारणी व लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री मुनगंटीवार उशिरा पोहोचले. या कार्यक्रमात उशिराने पोचलेल्या पालकमंत्री मुनगंटीवार यांनी नागपुरात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने आपण येऊ शकलो नसल्याची माहिती दिली.

खासदार धानोरकर यांनी वॉकिंग ट्रॅकचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी केवळ फलकावरील पडदा सारून उद्घाटन केले. त्यांनी कुदळ मारण्यास नकार दिला. खासदार धानोरकर देखील व्यस्त असताना अनेक कार्यक्रमात उशिरा जातात, हे मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिले.

याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठलीही संमती न घेता स्थानिक अपक्ष आमदार शिंदे समर्थक किशोर जोरगेवार यांचे नाव टाकल्याने वाद ओढविला होता. 24 तासात एकाच कार्यक्रमावरून वादाचे अनेक प्रसंग उदभवल्याने सुविधा उभारणी चांगलीच चर्चेची ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT