Nanded Saam
महाराष्ट्र

Nanded: दारु ढोसून आई अन् बायकोला मारहाण; आईनेच पोराच्या डोक्यात केले वार, घरातच रक्ताचा पाट

Drunk Sons Harassment Leads to Mothers Fatal Action in Nanded: सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या आणि आई-पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाचा, अखेर जन्मदात्या आईनेच धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

संजय सुर्यवंशी, साम टीव्ही

सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरी या गावात घडली आहे. मृत तरूण नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे. तसेच आई आणि पत्नीला मारहाण करायचा. याच गोष्टीला कंटाळून आईने मुलाला संपवण्याचे ठरवले. या प्रकरणी आईविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

मृत तरूणाचे नाव बालाजी नागा राऊत असे आहे. तो गेल्या अनेक वर्षांरपासून दारूच्या व्यसनेत बुडालेला होता. दारूच्या नशेत तो अनेकदा आई आणि पत्नीला मारझोड करी. शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे, शिवीगाळ करणे, भांडण हे त्याचे रोजचे झाले होते. पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती.

५ एप्रिल रोजी, बालाजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन शेतातील आखाड्यावरून दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने आईसोबत पुन्हा वाद घातला. आईला संताप अनावर झाला. आईने थेट धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यात वार केले. या हल्ला इतका जोरदार होती की यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मृतकाचा भाऊ नरसप्पा नागा राऊत याने भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी नागाबाई राऊत (वय वर्ष ६०) या महिलेवर कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT