electric Shock Saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावमध्ये हळहळ

जळगावच्या जुना असोदा रोड परिसरात घरासमोर लोंबकळणारी वीजतार बाजूला करण्याचा प्रयत्न करताना राहुल सपकाळे यांना विजेचा धक्का बसला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई सुनंदा सपकाळे यांनाही विजेचा धक्का बसला.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी :

जळगाव शहरातील जुना असोदा रोड परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर लोंबकळत असलेली विजेची तार बाजूला करण्यासाठी कट करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल सपकाळे आणि त्यांच्या आई सुनंदा सपकाळे अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुना असोदा रोड परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना असोदा रोड परिसरात राहणारे राहुल सपकाळे यांच्या घरासमोर एक विजेची तार धोकादायक स्थितीत लोंबकळत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा इतरांना याचा त्रास होऊ नये, या उद्देशाने राहुल हे ती तार कट करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या तारेत वीजप्रवाह सुरू असल्याचा त्यांना अंदाज आला नाही. तार कट करत असतानाच राहुल यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते तारेला चिकटले.

राहुल यांचा आवाज ऐकून आणि त्यांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आई सुनंदा सपकाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मुलाला तारेपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात सुनंदा यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्या देखील जागीच कोसळल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती या मायलेकांना मृत घोषित केले.

एकाच कुटुंबातील मायलेकांचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याची बातमी समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एकाच वेळी दोघांवर काळाने घाला घातल्याने सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Preparation Tip: लग्नाला फक्त काही दिवस उरलेत? नवरीने स्ट्रेस न घेता आवर्जून करा या ६ गोष्टी!

Maharashtra News Live Update: शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला कोळी येथे शेतकऱ्यांनी केला विरोध

Bike engine care tips: बाईक सुरू केल्यानंतर स्पीड कधी वाढवायचा? जाणून घ्या योग्य वेळ

अखेर एमएस धोनीने घेतली निवृत्ती; आता चेन्नई सुपर किंग्ससाठी निभावणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी

शेतकऱ्यांना २ हजारांचा हप्ता मिळणार का? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT