आरक्षणासाठी रामोशी समाजाचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा... विजय पाटील
महाराष्ट्र

आरक्षणासाठी रामोशी समाजाचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

सांगलीतील रामोशी समाजाने आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. तातडीने न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगलीतील रामोशी समाजाने आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. तातडीने न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. बेरड आणि रामोशी एकच जमाज असून नाहकरित्या वेगवेगळ्या गटात समाविष्ट केले आहे. (Morcha of Ramoshi Samaj at Sangli District Collector's Office for reservation)

हे देखील पहा -

बापट समितीचा अभ्यास करुन केंद्र शासनाकडे अनुसूचित जाती- जमातीच्या यादीत समावेश करण्यात यावा, समाजाला राजकीय आरक्षण तातडीने देण्यात यावे आणि नॉन क्रिमीलेयरचे दाखले तातडीने देण्यात यावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी रामोशी समाजाच्यावतीने आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे आणि जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मंडले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वालचंद कॉलेजसमोरून या मोर्चाची सुरवात करण्यात आली.

या मोर्चात सांगली जिल्ह्यातील बेरड समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

सरकार चार पावले पुढे येत असेल तर...; एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'लाडकी बहीण'सह या २५ योजनांसाठी सरकारचा मोठा निर्णय, पाहा यादी

Railway Rules: कुटुंबीयांची बर्थ वेगवेगळ्या डब्यात मिळाल्यास सीट बदलता येते का? काय आहे रेल्वेचा नियम

India Fort : ३६ किलोमीटर लांब भिंत! 'या' किल्ल्याची भव्य रचना पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT