विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सांगली जिल्हा परिषदेवर धडक... विजय पाटील
महाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सांगली जिल्हा परिषदेवर धडक...

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातले शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. (Morcha of Gram Panchayat employees at Sangli Zilla Parishad office for various demands)

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. १० ऑगस्ट २०२० पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आला आहे. मात्र अद्यापही हे वेतन मिळत नाही, याशिवाय जे वेतन आहे, ते देखील वेळेवर मिळत नाही. तसेच प्रॉव्हीडंट फंडाची कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरली जात नाही.

त्याचबरोबर काही ग्रामपंचायतीमध्ये कपात केलेल्या रकमेत अपहार होत आहे. असा आरोप करत किमान वेतन व विशेष भत्त्यासह विविध मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने, सांगली जिल्हा परिषद कार्यालयावर सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीमधील असणारे शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मारत जोरदार निदर्शने करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT