Monsoon In Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मान्सूनची चाल थबकली, अनेक ठिकाणी पावसाची उघडीप; 'या' तारखेपासून पुन्हा होणार सक्रिय

Satish Daud

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मान्सूनची चाल थबकली असून रविवारी (ता. १७) देखील काहीच प्रगती झाली नाही. सध्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या, तरी अद्याप विदर्भात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी दोन तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सूनचा वेग मंदावला असला तरी सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, या सरींचा देखील जोर कमी झाला आहे. खान्देश आणि पूर्व विदर्भातील मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे.

दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. काही ठिकाणी तापमानवाढीमुळे हवेतील बाष्पाचे ढगांत रूपांतर होत आहे. त्यामुळे मेघगर्जना, वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन-चार दिवसांत अरबी समुद्रातील र्नैऋत्य मोसमी पावसाची शाखा आणखी मजबूत होईल. त्यामुळे २० जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल. तसेच देशाच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होईल.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस

रविवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. धाराशिवसह, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सध्या मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली असून त्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT