Molgi Rural Hospital Saam Tv
महाराष्ट्र

मोलगी ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात; दुर्गम भागातील 85 पाड्यांचा भार

आतापर्यंत राज्याचे दोन राज्यपाल व दोन मुख्यमंत्र्यांची भेट मात्र समस्या जैसे थे...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी रुग्णालय (Hospital) सुरू करण्यात आले. रुग्णांना सेवाही मिळू लागली. २००९ पासून या रुग्णालयाचे प्रवेशद्वार अद्यापही बंदवस्थेतच आहे. सुमारे ८५ पाड्यांना आरोग्य सेवा देणारे मोलगी येथील ग्रामीण रुग्णालय एक-ना-अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. (Nandurbar Latest News)

दुर्गम-अतिदुर्गम भागातील रहिवाशांना सेवा मिळावी यासाठी सन २००९ मध्ये तत्कालीन मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे, परिवहन मंत्री सुरूपसिंग नाईक, जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावित आदींच्या उपस्थितीत रुग्णालयाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. दुर्गम भागातील रहिवाशांना तात्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा या रुग्णालयामागचा प्रमुख उद्देश होता.

मात्र आज हे ग्रामीण रुग्णालय एक-ना-अनेक समस्यांचा विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अतिक्रमण झाल्याने उद्घाटनानंतर रुग्णालय सुरू झाले पण प्रवेशद्वार मात्र आजही बंदावस्थेतच आहे. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पर्यायी रस्त्याने मागच्या बाजूने रुग्णालयात येण्यासाठी वाट काढावी लागत आहे. दरम्यान, याप्रकरणी आता प्रवेशद्वार तसेच रुग्णालयाच्या आवारात असणारे खासगी अतिक्रमण काढण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हे देखील पहा -

याशिवाय गेल्या आठ वर्षांपासून येथे कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे सुरू असलेले काम बंद अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर वेळेवर न आल्याने अनेकदा रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कमी कर्मचाऱ्यांमध्ये अनियमितता आढळून येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मोलगी हे बाजाराचे ठिकाण असून या ठिकाणी नर्मदा काठापासून जवळपास 85 पेक्षा अधिक पाड्यावरील नागरिक खरेदी-विक्री सह बँक तसेच इतर सुविधांसाठी येत असतात मात्र या ठिकाणी विजेचा प्रश्न गंभीर आहेच मात्र परिसरातील इतर खेड्यांवर मोबाईल नेटवर्क ची सुविधा दिली गेली आहे, परंतु मोलगी बाजाराचे ठिकाण असून देखील या ठिकाणी सुविधांसाठी दुर्लक्ष केले गेले आहे. या ठिकाणी असलेला बीएसएनएल कंपनीचा टावर फक्त नावालाच असल्याचे दिसून येते अनेक वेळा बीएसएनएल कंपनीची सेवा वीज व डिझेल अभावी ठप्प होऊन मोबाईल सेवा विस्कळित होते.

सुमारे ८५ पाड्यांना आरोग्य सेवा पुरविणारे ग्रामीण रुग्णालय असले तरी दररोज येथे जवळपास १७ ते १८ तास लोडशेडींग असल्याने समस्यांचा सामना करावा लागतो. शवविच्छेदन गृह, रक्तपेढी वीजेअभावी निकामी ठरत आहेत. जलकुंभ असले तरी नऊ वर्षांपासून यास पाण्याची प्रतिक्षा आहे. दररोज जवळपास ७० ते ८० रुग्ण प्राथमिक उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र रुग्णालयात पदे रिक्त असल्याने सेवा देतांना तोकड्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडत आहे.

मोलगी परिसर जंगल भागात असल्याने येथे सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. यामुळे वेळेवर सुविधा न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची भिती अधिक असते ख़रे तर रुग्णालयात अशा समस्यांचा डोंगर असला तरी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन तत्पर असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. यांच्या पुढाकाराने आता लवकरच या ठिकाणी सोलर पॅनल द्वारे काही प्रमाणात का होईना पण विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोलगी ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून हालचाली गतिमान करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे. असे असले तरी नुसता कागदांचा खेळ न करता प्रत्यक्ष अमंलबजावणी होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

मोलगी येथील ग्रामीण रुग्णालय दुर्गम भागात असलं तरी अद्यापपावेतो गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत या रुग्णालयाला दोन राज्यपाल, दोन मुख्यमंत्री यांनी भेट दिली आहे. तरीही रुग्णालयाला असलेल्या समस्यांचे ग्रहण मात्र अद्यापही सुटलेले नाही. जिल्हा प्रशासन पोलीस विभाग व जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना अनेक वेळा येथील नागरिकांच्या वतीने लेखी व तोंडी निवेदने देण्यात आले आहे परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही. अतिक्रमण काढण्यासाठी मोलगी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून शासनाला सादर केला आहे.

मोलगी ग्रामस्थांच्यावतीने भुमापन क्षेत्र ८६ जवळपास १.९१ आर जमीन आरोग्यसेवेसाठी देणगी रुपात दिली आहे. परंतु इतर नागरिकांनी अतिक्रमण करून जमीन बळकावली आहे. सदर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून शासनाने जमीन ताब्यात घ्यावी अन्यथा मूळ मालकाला परत द्यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांनी केली आहे. अतिक्रमणा सह रुग्णालयातील अनेक समस्यांचे आता प्रशासनाने मरगळ झटकून समस्या सोडविण्याची अपेक्षा येथील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येते आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Mega Block: रविवारी बाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघा! 'या' मार्गांवर लोकलच्या फेऱ्या रद्द

पुष्कर मेळ्यात मध्य प्रदेशच्या ‘काळा बादल’ची चर्चा; अवघ्या २० महिन्यांत वजन ७६० किलो

Maharashtra News Live Update: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली

लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन! पुण्यात बड्या नेत्यांची खलबतं,राहुल गांधींकडे जाणार महाराष्ट्राचा रिपोर्ट

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाकडून महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण

SCROLL FOR NEXT