Beed Saam
महाराष्ट्र

Beed Crime: ५३ वर्षीय नराधमानं शाळेच्या आवारात मुलीला छेडलं, संतप्त पालकांनी बदडलं

Beed School Molestation Case Accused Arrested: बीड शहरातील एका इंग्रजी शाळेच्या परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या ५३ वर्षीय नराधमाला संतप्त पालकांनी अक्षरशः चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Bhagyashree Kamble

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीडमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका इंग्रजी शाळेच्या परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या नराधमाला पालकांनी चांगलाच चोप दिला आहे. चोप दिल्यानंतर पालकांनी नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनींच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बीडमधील एका शाळेत संतप्त प्रकार घडला. शाळेच्या आवारत एक ५३ वर्षीय नराधमाने विद्यार्थीनींची छेड काढली होती. नंतर विद्यार्थीनींनी आपल्या पालकांना याची माहिती दिली. पालकांनी सकाळी थेट शाळा गाठली. तसेच आरोपीला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पालकांनी पोलिसांना बोलावून घेतलं.

पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या धक्कादायक घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता दामदार करीत आहेत. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर, बीडमधील वातावरण तापलं होतं. यानंतर बीडमधील गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच एका शाळेत नराधमाने विद्यार्थीनींची छेड काढली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. या घटनेमुळे महिला विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT