Palghar Saam
महाराष्ट्र

BJP Leader: भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ, जमिनीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण; CCTV व्हायरल

Molestation Case: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या लोकसभा संघटक म्हणून कार्यरत असलेल्या नंदकुमार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीचा आरोप एका महिलेनं केला आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात पाटील आणि त्यांच्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून वादग्रस्त घटना

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून संबंधित महिलेसोबत वाद झाला. वाद टोकाला गेला. यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करताना महिलेला विवस्त्र केल्याचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. तर, दुसऱ्या एका सीसीटीव्हीत मारहाण करताना दृश्य कैद झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही सध्या व्हायरल होत आहे.

विनयभंगाचा गुन्हा दाखल

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, नंदकुमार पाटील आणि त्यांच्या भावांनी जमिनीच्या वादातून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यामुळे विनयभंग, मारहाण, आणि गैरवर्तनाचे कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. आरोपींवर लवकरच कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT