Bhaskar Jadhav News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra politics: मोठी बातमी! 'शिंदे गटात जाण्यासाठी भास्कर जाधवांनी केले होते 100 फोन...' भाजप नेत्याचा खळबळजनक खुलासा

भास्कर जाधव यांच्यावर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भास्कर जाधव गटात घेण्यास इच्छुक नसल्याचेही या ट्विटमध्ये म्हणले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mohit Kambhoj: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी 100 वेळा फोन केल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. (Latest Marathi update)

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी भास्कर जाधव यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. "भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या गटात सहभागी होण्यासाठी १०० वेळा कॉल केल्याचा दावा या ट्विटमध्ये केला आहे. मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भास्कर जाधव गटात घेण्यास इच्छुक नसल्याचेही" या ट्विटमध्ये म्हणले आहे.

इतकेच नव्हे तर "भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीटही बुक केल्याचेही मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. जाधव हे सत्य नाकारू शकतात का?" असा थेट सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. या ट्विटनंतर राजकीय मैदानात चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली होती. ज्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT