Sakal Saam Survey saam tv
महाराष्ट्र

Sakal Saam Mahasurvekshan : राज्यात भाजप मोठा पक्ष! पण महाविकास आघाडी कायम राहिल्यास तगडं आव्हान

Sakal Saam Survey On Modi government : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा तब्बल ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या ९ वर्षांतील सरकारच्या सर्वच क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा सकाळ-साम समुहाने घेतला आहे.

Chandrakant Jagtap

Modi Government@9: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा तब्बल ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मोदी (Narendra Modi) सरकारच्या या ९ वर्षांच्या सर्वच क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा सकाळ-साम समुहाने घेतला आहे. सकाळ माध्यम समूहानंही केलेल्या महासर्वेक्षणात (Sakal Saam Survey) जवळपास ५० हजार लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आली.

या सर्वेक्षणात (Sakal Mahasurvekshan) मोदी सरकारच्या कामगिरीविषयी जनतेची 'मन की बात' जाणून घेण्याचा प्रयत्न 'सकाळ'ने केला आहे. राज्यातील जनतेला केंद्र सरकारच्या कामगिरी आणि भाजपबाबत काय वाटतं आणि महाविकास आघाडीविषयी लोकांची काय मतं आहेत हे देखील या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आलं. यावेळी लोकांनी कायम तं नोंदवली पाहूया.

मतदानासाठी कोणत्या पक्षाची निवड कराल?

मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न या सर्वेक्षणातून विचारण्यात आला. यात भाजपला लोकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या प्रश्नावर 33.8 टक्के लोकांनी भाजपला मतदान करू असे उत्तर दिले आहे, तर त्यापाठोपाठ 19.9 टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दर्शवली आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 15.3 टक्के, शिवसेना (एकनाथ शिंदे) 5.5 टक्के, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 12.5 टक्के, शेकाप 0.7 टक्के, वंचित बहुजन आघाडीला 2.9 टक्के, AIMIM ला 0.6 टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला 0.5 टक्के, भारत राष्ट्र समिती (केसीआर) 0.5 टक्के, अपक्षांना 1.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर यापैकी कोणालाही नाही असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या 5.9 टक्के आहे. (Sakal Saam Survey on Modi Government 9 years work)

महाविकासआघाडीचं भाजपसमोर तगडं आवाहन

लोकांच्या या मतांवरून असे लक्षात येते की भाजपची लोकप्रियता अजूनही लोकांमध्ये आहे. परंतु विरोधक एकत्र आल्यास भाजपसमोर तगडं आवाहन उभं राहू शकतं. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची महाविकास आघाडी आहे. ही महाविकासआगाडी जर आगामी निवडणुकात एकत्र लढली तर भाजपसमोर तगडं आवाहन उभं करू शकते. या तिन्ही पक्षांची मतं एकत्र केल्यास 47.7 टक्के लोकांची पसंती महाविकास आघाडीला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी भाजपलं तगडं आवाहन उभे करू शकते. (Latest Political News)

Sakal Saam Survey
Sakal Saam Survey

पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते का?

या सर्वेक्षणात लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 42.1 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे, तर नाही म्हणणाऱ्या लोकांची संख्या देखील याच्याच जवळपास आहे. 41.5 टक्के लोकांनी या प्रश्नावर नाही असे उत्तर दिले आहे, तर 16.4 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले. त्यामुळे मोदींची लोकप्रियता टिकून असली तरी विरोधकांचं तगडं आवाहन मोदींसमोर असणार आहे असे यावरून दिसून येते. राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो असे या सर्वेक्षणातून दिसून येते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Privacy: व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग पूर्णपणे खाजगी ठेवायचंय? मग 'ही' सेटिंग लगेच अ‍ॅक्टिव्ह करा

Hair Care: चहाच्या पानांच्या पाण्याने केस धुण्यामुळे होतील 'हे' फायदे

Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजना फेल; राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार|VIDEO

Maharashtra Live News Update : 'कोणाच्या कानाखाली आवाज काढणं खूप सोपं असतं' : बच्चू कडू

Pravin gaikwad : माझ्या हत्येचा कट, पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित; काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाडांनी कोणती भीती व्यक्त केली?

SCROLL FOR NEXT