mob sets school bus on fire near chhatrapati sambhaji nagar  saam tv news
महाराष्ट्र

Mob Sets School Bus On Fire : स्कूल बसची बालकाला धडक अन्..., ते दृश्य पाहून आईने फोडला हंबरडा

या बसमधील 10 ते 12 विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती बिडकीन पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhaji Nagar News :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे एका स्कूल बसने चार वर्षाच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने संतप्त हाेत स्कूल बस पेटवून दिली. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या घटनेनंतर स्कूल बस चालक हा पळून गेला. या घटनेत हमजा शाहरुख शेख या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ताे त्याच्या आई समवेत किरणा दुकानात निघाला होता. या दरम्यान सुसाट वेगाने आलेल्या बसने त्याला चिरडले. हे दृष्य पाहून हमजा याची आई भावूक झाली. तिने हंबरडा फाेडला.

दरम्यान संतप्त जमावने या बसमधील 10 ते 12 विद्यार्थी यांना बसमधून बाहेर उतरवले. त्यानंतर बसला घेराव घालून बसची तोडफोड केली आणि बस पेटवून दिली. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेड देखील घटनास्थऴी पाेहचले. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT