raj thackeray and nitin gadkari  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray | नितीन गडकरी जे काही करतात, ते भव्य दिव्यच करतात; राज ठाकरेंकडून कौतुक

नितीन गडकरी जे काही करतात, ते भव्य दिव्यच करतात, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासकामाचं कौतुक केलं.

संजय डाफ

Raj Thackeray News : 'मी नागपुरातील म्युझिकल फाउंटन सारखा फाउंटन भारतात कधी बघितला नाही. भारताबाहेर असे फाउंटन बघितले आहे. नितीन गडकरी जे काही करतात, ते भव्य दिव्यच करतात, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासकामाचं कौतुक केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी नागपपुरातील फुटाळा तलावाजवळील म्युझिकल फाउंटनला भेट दिली. त्यानंतर नागपुरातील एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोघांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या विकास कामांचे कौतुक केले.

राज ठाकरे म्हणाले, 'मी नागपुरातील म्युझिकल फाउंटन सारखा फाउंटन भारतात कधी बघितला नाही. भारताबाहेर असे फाउंटन बघितले आहे. नितीन गडकरी जे काही करतात, ते भव्य दिव्यच करतात. गडकरी हे खाली करत नाही. वरच करतात. सर्व उड्डाणपूल त्यांनी केले. गडकरी आणि माझे विचार जुळतात. कारंजा शहर म्हणून नागपूरला म्हणता येईल. मी असे कारंजा बघितले नाही, जे काही बघितले ते बाथरूम मधेच'.

दरम्यान, सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. नितीन गडकरी म्हणाले, 'राज ठाकरे हे कलाकार आहेत. राजकारणातील नाही. त्यांना चित्रकार म्हणून मी त्यांना विशेष आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे ते आले. राज ठाकरे हे लता मंगेशकर यांचे चाहते आहेत. या फाउंटनला लता मंगेशकर यांच नाव दिलं जाणार आहे. सध्या याचं काम पूर्ण व्हायचं आहे. तलावावर अनेक गोष्टी होणार आहे. फ्लॉवर गार्डन होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT