mns aggression for marathi board in alibag and navi mumbai saam tv
महाराष्ट्र

MNS Protest For Marathi Patya: मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना फासले काळे, अलिबाग, नवी मुंबईत मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

मनसैनिकांनी काही मॉलच्या बाहेर आणि आत जात मराठी पाट्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे / सचिन कदम

MNS Andolan For Marathi Patya :

मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यभरात मनसेने आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहयला मिळत आहे. आज (मंगळवार) रायगड (raigad) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) येथे मनसैनिकांनी (MNS Karyakata) मराठी पाट्यांसाठी आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आस्थापनांवर मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) अलिबाग शहरात फेरफटका मारत फलकांची पाहणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिथे मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेत पाट्या दिसल्या त्यांना काळे फासले व संबंधित व्यापारी आणि आस्थापनांच्या प्रमुखाशी चर्चा करत पुढील तीन दिवसात मराठी पाट्या लावण्याची विनंती केली. तसेच तीन दिवसात मराठी पाट्या लागल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आला आहे.

मराठी पाट्यांवरून नवी मुंबईत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. मनैसिकांनी नवी मुंबईतील काही मॉल मध्ये जात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मॉल प्रशासनाला मराठा पाट्या का लावल्या नाहीत असा जाब विचारला. तसेच पुढील दोन दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी मॉल प्रशासनाला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT