Ajit Pawar, MLC Shashikant Shinde, MLA Mahesh Shinde, NCP, BJP saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar हेच भाजपात आले तर तुमचं काय हाेईल ? साता-यात आमदारांची गुगली (पाहा व्हिडिओ)

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेेते अजित पवार हे दाेन दिवस सातारा जिल्हा दाै-यावर येणार आहेत.

ओंकार कदम

Satara News : आमदार महेश शिंदे हे कधी भविष्य सांगायला लागले ? त्यांनी स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी असा टाेला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना लगावला आहे. आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब हाेणार असल्याचे वक्तव्य नुकतेच व्यक्त केले हाेते. त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार महेश शिंदेंवर टीका केली. (Maharashtra News)

आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) म्हणाले महेश शिंदे (mla mahesh shinde) हे कधी पासुन भविष्य वक्त करु लागले हे कळत नाही. त्यांनी स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करावी. त्यांनी आमच्या नेत्यांवर बोलु नका असं सांगुन तुम्हीच काही दिवसांनंतर येणा-या निकालात अपात्र ठराल. यामुळं तुमचं अस्तित्वच धोक्यात आहे.

आमचे नेते अजित पवारांवर (ajit pawar) बोलु नका. अजित पवारच भाजपात आले तर तुमचं काय होईल असा प्रतिसवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना केला आहे.

सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेस उत्तर

खासदार शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या घडामाेडीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे अशी टीका केली होती. या टीकेचा आज आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार समाचार घेतला.

ते म्हणाले भाजप पक्ष हा दोन खासदारांचा पक्ष आज राष्ट्रीय पक्ष झाला आहे. त्यांची हातोटी आम्हांला जमली नाही. आम्ही लोकशाहीतून चाललो म्हणून आमची हातोटी कमी पडली. मला खात्री आहे परत राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल. आता थोडी मतात घट झाली असेल पण आता त्या मध्ये दुरुस्ती करू आणि येणाऱ्या काळात मुनगंटीवार यांच्या पक्षामुळेच ही संधी लवकर मिळेल असेही शिंदेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Safety : स्मार्टफोन ठेवण्याची चुकीची सवय? सावधान! या दुर्लक्षामुळे होऊ शकते मोठा तोटा

मधुमेहाच्या रूग्णांनी 'ही' फळं खावीत; शुगर वाढण्याची समस्या येणार नाही

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

SCROLL FOR NEXT