Kankavali , MLA Vaibhav Naik saam tv
महाराष्ट्र

Kankavali News : कनेडीच्या राड्यात आमदार वैभव नाईकांनी थाेपटले दंड अन्...

आज कनेडी गावात गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयाेजिले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kankavali News : कणकवलीतील कनेडी गावात मंगळवारी भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट शिवसेना पदाधिकाऱ्यांत राडा झाला हाेता. यावेळी शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले हाेते. सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याने आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) हे संतापले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना थाेपविण्यासाठी दंड थाेपाटले मात्र माघी गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) पार्श्वभुमीवर गावातील वातावरण तणावपुर्ण हाेऊ नये यासाठी वेळीच पाेलिसांनी (Police) आमदार वैभव नाईक यांना राेखले. (Kankavali Latest Marathi News)

कणकवली तालुक्यातील कनेडी येथे उद्धव ठाकरे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. प्रथम शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला व नंतर भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. भाजपचे शेकडो कार्यकर्ते कनेडीत जमू लागले.

शिवसेनेचे ही असंख्य कार्यकर्ते शाखेत जमले होते. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक देखील तात्काळ कनेडीत दाखल झाले. भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखेसमोर जमत जोरदार शिवीगाळ केली. एका रिक्षाला ही लक्ष करण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण असताना आक्रमक झालेले आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जातानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंगावर धावून जाणाऱ्या आमदारांना पोलिसांनी अडवलं अन्यथा राडा आणखी वाढला असता. पोलिसांनी जादा कुमक मागवून तणावपूर्ण वातावरणावर नियंत्रण मिळवलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT